free css templates


जनता सर्वात महत्वाची


डॉ.अतुल भोसले यांच्या जीवितकार्याचा विचारांचा जो आधार आहे, त्याचा मूलमंत्र आहे, जनता सर्वांत महत्त्वाची! राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच त्यांना घरातूनच लोकसेवेचे बाळकडू मिळाले आणि लहानपणी मिळालेली ही शिकवण त्यांनी आयुष्यभर पाळली आहे. राजकारणात वाटचाल सुरू करताना डॉ.अतुल भोसले यांनी सत्तेपेक्षा जनता महत्त्वाची हे सूत्र ठरविले. केवळ आपल्याला सत्ता मिळविण्याने आपण लोकांचे भले करू शकत नाही तर आपल्या नेतृत्वामुळे जनतेच्या हाती सत्ता आली पाहिजे, लोकांना सबल झाल्याचे जाणवले पाहिजे, असे डॉ.अतुल भोसले यांना वाटते. लोकांना सबळ केले तर ते विकासाच्या मार्गावर खूप पुढे जाऊ शकतात, असे त्यांचे मत आहे. त्यांची धोरणे, त्यांचा अजेंडा, आणि त्यांची सेवा या सर्वांची एकच भाषा आहे – जनतेची भाषा. लोकांसाठी त्यांची समर्पण भावना परिपूर्ण आहे. भल्या पहाटे असो नाही तर मध्यरात्री, ते सदैव लोकसेवेसाठी सज्ज असतात..
• पायाभूत सुविधांचा टिकावू विकास करणे
• अत्यावश्यक सार्वजनिक सेवा प्रभावीरित्या मिळतील याची व्यवस्था करणे
• प्रत्येकाला नियमित पाणी आणि विजेचा पुरवठा होईल याची हमी
• नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे आणि परिसराचे सौंदर्य राखणे यासाठी प्रयत्न
• युवक व महिलांसाठी रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध करणे
• राजकीय पारदर्शितेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे
• दारिद्र्य निर्मूलनासाठी आणि झोपडवासियांना पक्की घरे मिळण्यासाठी काम करणे


Copyright @ 2019 Dr. Atul Bhosale - All Rights Reserved