
कराड दक्षिणच्या डोंगरी भागाला वरदायिनी ठरलेल्या उंडाळे प्रादेशिक पाणी योजनेसंदर्भातील आढावा बैठक
कराड दक्षिणच्या डोंगरी भागाला वरदायिनी ठरलेल्या उंडाळे प्रादेशिक पाणी योजनेसंदर्भातील आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेत अधिकारी व कर्मचारी बांधवांशी संवाद साधला. योजनेच्या व्यवस्थापनात कोणताही हलगर्जीपणा अथवा कामात कसूर खपवून घेतली जाणार नाही.
शेतकरी बांधवांसह येथील नागरिकांना वेळोवेळी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, काही तांत्रिक अडचणी आल्यास त्याचा जलद गतीने निपटारा करावा यासह विविध सूचना यावेळी संबंधितांना दिल्या. तसेच थकीत वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता योग्य तोडगा काढण्यास प्राधान्य देऊ अशी ग्वाही देखील यावेळी दिली.


