आ. डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले साहेबांचा परिचय
आमदार, कराड दक्षिण । प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा
डॉ. अतुल भोसले यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, दिवसरात्र कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना डॉ.अतुल भोसले जराही बिचकत नाहीत. उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे.
समाजकार्यात वावरताना भावनेला कधीही अंतर न देणारे, निस्वार्थी, अत्यंत स्वाभिमानी, अभ्यासातून व्यक्त होणारे स्पष्ट विचारांचे व्यक्तिमत्व म्हणजे आ. डॉ. अतुलबाबा होय. जनता सर्वांत महत्त्वाची ! हेच त्यांचे पहिले आणि शेवटचे तत्त्व. कामाचा अविरत सपाटा, जनसेवेसाठी २४ तास उपलब्धता, प्रत्येकाच्या अडीअडचणीत मोलाचे सहकार्य, कोणालाही अंतर न देता सर्वांशी मिळून-मिसळून वागणे यासह अनेक बाबी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर टाकणाऱ्या आहेत. कितीही संकटे आली तरी शेवटपर्यंत लढा द्यायचा आणि विजय खेचून आणायचा हा त्यांचा गुणविशेष त्यांचा राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा आहे.
आदर्श व सर्वसमावेशक सहकाराचा वारसा लाभलेल्या भोसले परिवारात २८ मार्च १९८३ रोजी त्यांचा जन्म झाला. सहकामहर्षी ही ख्याती असलेले आजोबा स्व. जयवंतराव (आप्पा) भोसले व आदर्श सहकाराचा वसा प्राणपणाने जपणारे मा. सुरेश जयवंतराव भोसले यांचा पुत्र असलेले आ. डॉ. अतुलबाबा यांनी एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली आहे. कार्यावर निष्ठा हेच त्यांचे जीवन आहे. समाजासाठी सतत काम करत राहणं हा त्यांचा श्वास. वैद्यकीय व्यवसायाऐवजी समाजकारणात येताना गोरगरीब हा त्यांचा केंद्रबिंदू आणि उपेक्षितांना बरोबर घेऊन जाणं हा त्यांचा धर्म.
राजकारणात वाटचाल सुरू करताना आ. डॉ.अतुलबाबा भोसले यांनी सत्तेपेक्षा जनता महत्त्वाची हे सूत्र ठरविले. केवळ आपल्याला सत्ता मिळविण्याने आपण लोकांचे भले करू शकत नाही तर आपल्या नेतृत्वामुळे जनतेच्या हाती सत्ता आली पाहिजे, लोकांना सबल झाल्याचे जाणवले पाहिजे, असे डॉ.अतुल भोसले यांना वाटते. लोकांना सबळ केले तर ते विकासाच्या मार्गावर खूप पुढे जाऊ शकतात, असे त्यांचे मत आहे. त्यांची धोरणे, त्यांचा अजेंडा, आणि त्यांची सेवा या सर्वांची एकच भाषा आहे – जनसेवा. भल्या पहाटे असो नाही तर मध्यरात्री, ते सदैव लोकसेवेसाठी सज्ज असतात.
विचारसरणी
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना आ. डॉ. अतुलबाबा जराही मागे हटत नाहीत. उच्च शिक्षित असूनही सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्यास ते सज्ज असतात. स्वकर्तुत्वाच्या बळावर यश मिळवणे हा त्यांचा गुणविशेष सर्वांनाच भावणारा आहे. वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले असे त्यांचे पारदर्शी नेतृत्व आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले साहेबांचा राजकीय प्रवास

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र

जिल्हा नियोजन समिती सातारा

सांगली जिल्हा व सांगली ग्रामीण भाजपा
डॉ. अतुलबाबा भोसले यांनी इतर भूषवलेली पदे
चेअरमन
- कृष्णा सहकारी बँक लि, रेठरे बुद्रुक.
विश्वस्त
- शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, शिवनगर.
संस्थापक
- कृष्णा फौंडेशन, वाठार.
- जयवंत इन्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एम.बी.ए.)
- कृष्णा इन्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर ऑपलिकेशन ॲण्ड मॅनेजमेंट.
- श्रीमंत जयश्रीदेवी नाईक-निंबाळकर इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
- कृष्णा इंग्लिश मिडीयम स्कूल, वाठार.
- सौ. जयमाला जयवंतराव भोसले इंग्लिश मिडीयम स्कूल शेटे.
- आदरणीय जयवंतराव भोसले अध्यापक विद्यालय.
संस्थापक
- कृष्णा नारीशक्ती मंच, रेठरे बुद्रुक.
- सहकार महर्षी जयवंतराव भोसले नागरी सह. पतसंस्था लि.
- जयवंत मागासवर्गीय अॅटोलूम को-ऑप इंडस्ट्रीज लि. मरळी
- राजर्षी शाहू मागासवर्गीय औद्योगिक सह. संस्था, मलकापूर.
- जयवंत मागासवर्गीय गारमैर लि. कराड.
- डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठान, मलकापूर.
- कृष्णा ज्येष्ठ नागरिक सामाजिक सेवा संस्था, मलकापूर
संचालक
- जयवंत शुगर्स लि. धावरवाडी.
सदस्य
- कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, मलकापूर
- कृष्णा अभिमत विद्यापीठ, मलकापूर.
संस्थापक
- कृष्णा सरिता महिला बझार, मलकापूर.
- कृष्णा प्रेस ग्रामीण विकास संघ, रेठरे बुद्रुक.
- कृष्णा महिला नागरी सह. पतसंस्था लि. रेठरे बुद्रुक.
