
कराड येथील 460 कोटींच्या सहापदरी उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर..
रस्ते परिवहन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोणत्याही क्षेत्राच्या सर्वांगीण व जलद विकासासाठी रस्त्यांचे जाळे मजबूत असणे अत्यंत महत्वाचे असते. हे ओळखून केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे रस्ते व दळणवळण मंत्रालय काम करत आहे. मा. गडकरीजींच्या अथक परिश्रमांमुळे देशातील रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांना भरघोस निधी मंजूर होऊन, अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे गेले आहेत. तर अनेक विकासप्रकल्प प्रगतीपथावर आहेत. सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. श्री. नितीनजी गडकरी यांनी 558 कोटी 24 लाख एवढा भरघोस निधी मंजूर केला आहे. यात पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कराहमध्ये नवीन सहापदरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 460 कोटी रूपये मंजूर झाले आहेत.
कराड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका येथे 2003 साली उड्डाणपूल बांधण्यात आला होता. पण या उड्डाणपुलालगत कोल्हापूर नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे यठिकाणी नवीन उडाणपूल उभारण्याची मागणी दीर्घकाळ कराडवासीयांमधून होत होती. जुना उड्डाणपूल पाडून पूर्णपणे नवा 3.2 कि.मी. लांबीचा सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. हा नवीन पूल सिंगल पिलरवरील भारतातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला सहापदरी पूल ठरणार आहे. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या पाठपुराव्याने होत असलेल्या या कामामुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे. तसेच कराड मलकापूर मार्गावरील याहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे.