
कृष्णा समूहाच्या सुमारे 25 टँकरद्वारे शहरात अहोरात्र पाण्याचा पुरवठा
जुलै २०२४ मध्ये कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाला होता. कराड शहरावासीयांना सुमारे 4 दिवस पाणीसमस्येला तोंड द्यावे लागले होते. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागल्याने कराडवासीयांची त्रेधातिरपीट उडाली होती. विशेषतः महिला वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
अशा स्थितीत कराडकरांची तहान भागविण्यासाठी आ. डॉ. अतुलबाबा भोसले थेट मैदानात उतरले. कृष्णा समूहाच्या माध्यमातून त्यांनी सलग 4 दिवस 25 टँकरच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी अहोरात्र सुमारे लाखो पिटर पाण्याचा पुरवठा केला. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी भरुन हे पाणी टँकरद्वारे दिले गेले. 4 दिवसांत पाण्याचा पुरवठा या माध्यमातून परण्यात आल्याने, कराड शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, या काळात डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातत्याने ‘ऑन फिल्ड’ राहून, वेळोवेळी पंपिंग स्टेशनला भेट देऊन, शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सूचना दिल्या. तसेच शहरात ठिकठिकाणी कृष्णा समूहाच्या टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करुन, नागरिकांशी संवादही साधला.