
प्रीतिसंगम घाटाच्या सुशोभीकरणासाठी आ. डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील
कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठी असलेल्या प्रीतिसंगम घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याठिकाणी असणाऱ्या उद्यानाच्या दक्षिणेला असलेला पंतांचा कोट हा पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे. तसेच याठिकाणी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असून, त्यास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. या परिसरात उद्यानालगत असलेल्या पायऱ्यांच्या भागावर आकर्षक फ्लॉवर बेड करणे शक्य आहे. तसेच या भागातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी करून, त्यावर लाईट शोच्या माध्यनातून आकर्षक विद्युत रोषणाई करणे शक्य आहे.
या भागाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन, या परिसराच्या सुधारणेसाठी कराड नगरपालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. या भागाचे ऐतिहासिक महत्व टिकविण्याच्या दृष्टीने, प्रीतिसंगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासह हा विकास आराखडा प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले विशेष प्रयत्नशील आहेत.