
भारतीय जनता पार्टी कार्यालय, कराड दक्षिण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकार बंधु व मीडियाचे सहकारी यांच्यासोबत संवाद साधला.
भारतीय जनता पार्टी कार्यालय, कराड दक्षिण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकार बंधु व मीडियाचे सहकारी यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी विविध प्रश्न आणि अनेक बाबींवर विस्तृत चर्चा केली.
अधिवेशनाच्या काळात मी कराड शहर, कराड ग्रामीण तसेच कराड दक्षिण मध्ये असलेल्या झोपडपट्टींचे पुनर्वसन करण्यासंबंधात, आमचे मार्गदर्शक मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेत प्रस्ताव सादर केला आहे. येणाऱ्या काळात पक्की आणि दिमाखदार घरे बेघरांना तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्यांना देण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. सध्या असलेल्या MIDC मधील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. Auto next ele tractor कंपनी कराड मध्ये येण्यास उत्सुक असून त्यांच्या माध्यमातून १३०० युवकांना रोजगार उपलब्ध होईल. मा. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून कराडमध्ये नवीन मिनी MIDC करायचा प्रस्ताव दिला असून, त्यांनी त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेत, शासनाकडून पूर्ण सहकार्य करायचा शब्द दिलेला आहे.
कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून, यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. या कामात मला तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज असून, तुम्ही सुद्धा कराड दक्षिण मध्ये करायच्या विकासकामांबद्दल मला सूचना द्या. महायुती सरकारच्या माध्यमातून मी नक्कीच त्या कामांची पूर्तता करायचा सर्वोतोपरी प्रयत्न करेन.


