
मा. राजेंद्रसिंह यादव व संबंधीत अधिकारी वर्गासमवेत पाटण कॉलनी झोपडपट्टी परिसराची पाहणी
मा. राजेंद्रसिंह यादव व संबंधीत अधिकारी वर्गासमवेत पाटण कॉलनी झोपडपट्टी परिसराची पाहणी करीत येथील नागरिकांशी संवाद साधला. या बांधवांचा पुनर्वसनाचा प्रश्न बरेच वर्षे प्रलंबित आहे. झोपडपट्टी पुनर्वसन केवळ गृहनिर्माणाच्या प्रश्नापुरता सीमित नाही तर तो अधिक व्यापक आहे.
त्यामुळे याचा सारासार विचार करून येथील लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी योग्य नियोजन, मुबलक आर्थिक सहकार्य आणि दीर्घकालीन विकासात्मक दृष्टिकोन अंगीकारून याबाबत तत्परतेने सहकार्यशील राहू अशी ग्वाही यावेळी सर्वांना दिली.





