
पुरवणी अर्थसंकल्प २०२४ मधून इजिमा १२४ भाग एनएच ०४ ते मालखेड गावातील रस्ता सुधारणा करणेसाठी १ कोटी ५० लाख निधी मंजूर
पुरवणी अर्थसंकल्प २०२४ मधून इजिमा १२४ भाग एनएच ०४ ते मालखेड गावातील रस्ता सुधारणा करणेसाठी १ कोटी ५० लाख निधी मंजूर करून दिल्याबद्दल व आमदार पदी निवड झालेबद्दल मालखेड ग्रामस्थांच्या मार्फत आयोजित भव्य नागरी सत्काराचा स्वीकार केला.
एनएच ०४ ते मालखेड गावातील रस्ता सुधारणा काम लवकरात केले जाईल हा शब्द ग्रामस्थांना दिला होता तो पूर्ण केला याचा आनंद असून त्याचे भूमिपूजन ही उत्साहात पार पडले. मालखेड गावाच्या विकासासाठी जे काही चांगले करता येईल ते मी प्राधान्याने करणार आहे. यामध्ये कधीच कमी पडणार नाही अशी ग्वाही यानिमित्ताने मी देतो. आपले प्रेम आणि पाठिंबा असाच सोबत राहो हीच सदिच्छा.


