
मौजे विंग येथील रस्ते कामाचे भूमिपूजन
मौजे विंग येथील रस्ते कामाचे भूमिपूजन तसेच कराड दक्षिणमधील विविध मान्यवरांचा भाजपा पक्षप्रवेश सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून जनतेचे हित सर्वोपरी ठेऊन सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी काम करतील असा शब्द दिला व भाजपात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले.
हा सोहळा केवळ विकास आणि राजकीय सहभागाचा नाही तर लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील दृढ विश्वास आणि सहकार्याचा प्रतीक स्पष्ट करणारा होता हे आवर्जून सांगावेसे वाटते. भाजपा हा केवळ एक राजकीय पक्ष नसून राष्ट्रहित आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणारा विचारप्रवाह आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासाने आणि सक्रिय सहभागाने पक्ष अधिक बळकट होत आहे. नव्याने पक्षात सामील झालेल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो.



