
१०० दिवस बदलत्या कराडच्या वाटचालीचे
दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, रस्त्यांची दुरावस्था, मूलभूत सुविधांची वणवा या अशा अनेक प्रश्नांनी आम्ही पार गुरफुटून गेलो होतो. या सगळ्यातून आम्ही बाहेर पडणार की नाही हे आमच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं होतं. तस बघायला गेलं तर मुळात या प्रश्नांची उत्तरे देणारा खमक्या लोकप्रतिनिधी नाही याची खूप खंत वाटायची. त्यामुळे परिवर्तन होणं आणि नवा चेहरा कराड दक्षिणमधून पुढे येणे गरजेचं होतं.
नोव्हेंबर २०२४ चा शेवटचा आठवडा निर्णायक होता. योजलं तेच घडलं. वेळोवेळी हुलकावणी देणारं अतुलपर्व याखेरीस मात्र दिमाखात सुरु झालं. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी येताच सपाटून कामाला सुरुवात केली आणि विकासाचा वेग काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं. “रस्ते उत्तम असतील, तर विकासाची गती वाढते,” हे तत्त्व आत्मसात करून आ. अतुलबाबांनी पहिल्या टप्प्यातच रस्त्यांच्या जाळ्यावर भर दिला.
कृष्णा कॅनॉल ते कारखाना रस्ता, काळुबाई पाणंद रस्ता (2.70 कोटी), कार्वे-कोडोली जुना रस्ता (3 कोटी), मौजे काले देसाई मळा रस्ता (2 कोटी), आगाशिवनगर जिल्हा परिषद कॉलनी स्वागत कमान, कणसे वस्ती ते विंग रस्ता (1 कोटी), मौजे ओंड-थोरात मळा ते ओंड ओंडोशी रस्ता (50 लाख), बेलवडे बु. ते कासार शिरंबे (2.75 कोटी), मौजे येळगाव–बौद्ध वस्ती जोड रस्ता (30 लाख) यासह विविध रस्त्यांना कोटींचा निधी आ. अतुलबाबांनी दिला. केवळ १०० दिवसात १२ कोटींहून अधिक निधी अतुलबाबांनी खेचुन आणला आणि विकासकामांचे नारळ पहिल्या दणक्यात फोडले. कराड दक्षिणच्या जनतेने उभे केलेल्या परिवर्तनाच्या या लढ्यात “अतुलपर्व” खऱ्या अर्थाने घडत आहे. विकासाचे मजबूत पायाभूत आधारस्तंभ उभारले जात आहेत आणि नव्या युगाचा प्रारंभ होत आहे !