
मौजे नारायणवाडी येथे ३४ लाख ५० हजार रु. रक्कम मंजूर करण्यात आलेल्या साकव पुलाचे भूमिपूजन
मौजे नारायणवाडी येथे ३४ लाख ५० हजार रु. रक्कम मंजूर करण्यात आलेल्या साकव पुलाचे भूमिपूजन ग्रामस्थ तथा मान्यवरांच्या उपस्थितीत केले. रहदारीची सोय सुलभ करण्याच्या दृष्टीने हा पूल मोठी भूमिका पार पाडणार आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात येथील नागरिकांची होणारी परवड कमी होण्यास मदत होणार आहे.
सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास, दळणवळणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे रस्ते व पूल यांची तातडीने उभारणी व लोकाभिमुख विकासकामांना प्राधान्य ही त्रिसूत्री उराशी बाळगून जनसेवा करीत आलो आहे पुढेही यात कधीच खंड पडू दिला जाणार नाही.


