
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण
स्व. पै. खाशाबा जाधव यांनी १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मगावी गोळेश्वर (ता. कराड) येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई येथे करण्यात आले. स्व. पै. खाशाबा जाधव यांची आठवण जपण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी हे संकुल त्यांच्या जन्मगावी उभारण्याचा शासनाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि कौतुकास्पद आहे.
या संकुलात –
1) २ आंतरराष्ट्रीय मॅटवरील कुस्ती मैदानं
2) ३०,००० स्वेअर फीट बिल्टअप एरिया
3) ३०० प्रेक्षक क्षमतेची गॅलरी
4) प्रशिक्षण व निवास व्यवस्था (५० खेळाडूंसाठी)
5) प्रशासनिक कार्यालय, डायनिंग, किचन
6) ऑडिओ-व्हिज्युअल रूम, फर्स्ट एड रूम
7) पार्किंग, अंतर्गत रस्ते, आधुनिक प्रकाश व्यवस्था
अशा सर्व सुविधा असणार आहेत.
या संकुलामुळे ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय पातळीचं क्रीडा इंफ्रास्ट्रक्चर निर्माण होईल. खेळाडूंसाठी निवास, डायट, व प्रशिक्षण यांचा एकत्रित केंद्र मिळेल. राज्यातील कुस्तीचा विकास आणि ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढेल. स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन नव्या पिढीला दिशा मिळेल. स्थानीय युवकांना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी मिळेल.
या उपक्रमासाठी तहसीलदार कल्पनाताई ढवळे व क्रीडा अधिकारी संगीताताई जगताप देखील उपस्थित होत्या. लवकरच या आराखड्याचे सादरीकरण राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि क्रीडा मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या समोर करण्यात येणार आहे. या संकुलाच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा शासनस्तरावर सुरु आहे. हे संकुल लवकरात लवकर वास्तवात यावे, यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.

