
कापील गावच्या रस्त्याच्या विकासासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर
कराड तालुक्यातील कापील गावच्या रस्त्याच्या विकासासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. सदरचे काम पूर्णत्वाकडे जात आहे याचा निश्चितच आनंद आहे. हा रस्ता केवळ कापील गावालाच नव्हे, तर आसपासच्या अनेक गावांना शहराशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण व रुंदीकरण या कामांमुळे आता रहदारी अधिक सुरळीत होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि दैनंदिन प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.
