
जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ – २४ अंतर्गत म.रा.वि.वि.कं.(एम.एस.ई.बी.) विकास व पध्दती सुधारणा
तत्परतेने पाठपुरावा करून जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ – २४ अंतर्गत म.रा.वि.वि.कं.(एम.एस.ई.बी.) विकास व पध्दती सुधारणा कामे यामधून येळगाव येथे विद्युत पुरवठा सुधारण्यासाठी १२ लाख २३ हजार रुपये तर टाळगाव येथे ११ लाख ३९ हजार रुपये मंजूर करून आणले होते.
सदर दोन्ही ठिकाणी नवीन डिपी बसविण्यात आले असून याचा येथील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यामुळे गावातील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत आणि स्थिर होईल. शेतीची कामे करीत असताना पाण्यासाठी पंप चालवण्यास, ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडिंग टाळण्यास व मशीनरीचा वापर सुरळीतपणे करण्यास शेतकऱ्यांना मोठे सहकार्य होईल.
