
प्रजिमा क्र. ७८ बेलवडे ते मालखेड रस्ता सुधारणा व आरसीसी गटर बांधकाम करणे या १ कोटी ५० लक्ष मंजूर निधीच्या कामाचे भुमीपुजन
प्रजिमा क्र. ७८ बेलवडे ते मालखेड रस्ता सुधारणा व आरसीसी गटर बांधकाम करणे या १ कोटी ५० लक्ष मंजूर निधीच्या कामाचे भुमीपुजन य. मो. कृष्णा सह. कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
या विकासकामामुळे परिसरात वाहतुकीस गती मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल. आरसीसी गटार बांधकामामुळे पावसाळ्यातील समस्या दूर होऊन आरोग्याच्या दृष्टीनेही ही बाब महत्त्वाची ठरेल. दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणेबरोबरच ग्रामीण विकासास सर्वोतोपरी सहाय्यभूत ठरणाऱ्या गोष्टी प्राधान्याने अमलात आणणेस आग्रही असल्याचे याप्रसंगी नमूद केले.


