
येवती-म्हासोली मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राच्या सिंचनास पाणी देण्यासाठी करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था करणे कामाच्या आराखड्यास जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून मंजुरी
वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे येवती-म्हासोली मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राच्या सिंचनास पाणी देण्यासाठी करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था करणे कामाच्या आराखड्यास जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून मंजुरी मिळाली आहे.
कराड दक्षिण मतदारसंघातील येवती- म्हासोली मध्यम प्रकल्पातून परिसरातील गावांसाठी वितरित केले जाणारे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे वितरित करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या बंदिस्त पाइपलाइन प्रकल्पामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणार असून, सुमारे 4 हजार एकरहून जास्त क्षेत्र पूर्णतः ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या परिसरातील गावांमधील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
