
५ ब्रास मोफत वाळू वाटप कार्यक्रम
कराड तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना तहसिल कार्यालय व उपविभाग अधिकारी कार्यालय, कराड यांचेमार्फत ५ ब्रास मोफत वाळू वाटप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून लाभार्थ्यांना वाळूचे वाटप केले.
या देशातील गरीब माणसाला बळ देण्याचे काम केंद्र आणि राज्यशासन करीत आहे. हे वाटप केवळ एक योजना नसून, ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांसाठी स्वप्नवत घरकुल उभारण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे ज्यात शासन निर्णायक भूमिका बजावत आहे, याचा निश्वितच आनंद वाटतो. घरकुल बांधकामासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना यातून मोठे सहकार्य होणार आहे.


