
कराड शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या बहुप्रतिक्षित क्रीडासंकुलाचा भूमिपूजन
कराड शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या बहुप्रतिक्षित क्रीडासंकुलाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. कराड व सातारा जिल्ह्यातील युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यातील कौशल्याला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यामध्ये मैदानी खेळांबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या भव्य क्रीडासंकुलाची उभारणी केली जात आहे. विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज हे संकुल स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ व त्यांच्या विकासाला चालना देणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास प्रसंगी अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, खेळाडू, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास आहे.



