
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठक
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकी प्रसंगी त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. स्टेडियमच्या सध्याच्या अवस्थेचा आढावा घेणेसह येथील सुविधा अद्ययावत करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
नवीन पिढीला खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात या दृष्टीने शासन स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे. स्टेडियममध्ये ट्रॅक सुविधा, प्रेक्षकांसाठी स्टँड, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी व शौचालय व्यवस्था तसेच पर्यावरणपूरक उपाययोजना या बाबींवर अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा झाली. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात व कराड हे एक आधुनिक क्रीडानगरी म्हणून नावारूपाला यावं, यासाठी विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी गांभीर्याने नक्कीच केली जाईल.


