
मौ. कालवडे येथे मंजूर रस्तेकामाचे भूमीपुजन
1) कालवडेतील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे – १० लाख रु.
2) कासारशिरंबे ते कालवडे रस्ता सुधारणा करणे – १ कोटी ८० लाख.
मौ. कालवडे येथे मंजूर रस्तेकामाचे भूमीपुजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते. रस्ते म्हणजे विकासाची मुख्य धुरा आहे. सदर रस्त्यांची कामे झाल्याने आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्याचा उज्ज्वल पाया रचला जाईल हा विश्वास आहे. या रस्ते कामामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांपासून ते वृद्ध व्यक्तींना प्रवासात मोठा दिलासा मिळेल शिवाय दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्यास मदत होईल.




