
५० लाख रु. निधी मंजूर करण्यात आलेल्या मौ. तारुख येथील रस्ते कामाचे भूमिपूजन
५० लाख रु. निधी मंजूर करण्यात आलेल्या मौ. तारुख येथील रस्ते कामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. या रस्त्याच्या विकासामुळे विशेषतः पावसाळ्याच्या काळात नागरिकांना जाणवणाऱ्या चिखल, खड्डे, धूळ यांसारख्या समस्या दूर होणार आहेत. विद्यार्थ्यांपासून शेतकरी, व्यापारी, महिला व वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासात रस्ते हा अत्यंत महत्वाचा घटक असून, तो केवळ संपर्क साधनच नाही तर अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि आपत्कालीन सेवांशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.



