
मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत कराड दक्षिण मधील विविध ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामसंसद इमारत मंजूर
मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत कराड दक्षिण मधील विविध ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामसंसद इमारत मंजूर झाली आहे. ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाचे बळकटीकरण ही यामागील प्रमुख उद्दिष्टये आहेत. ग्रामस्थांच्या गरजा, स्थानिक प्रश्न, विकासाचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी मजबूत आणि आधुनिक पायाभूत सुविधा असलेल्या या ग्रामसंसद इमारती ग्रामप्रशासनात मोलाची भूमिका पार पाडतील.
