Category मूलभूत सोयीसुविधा

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या प्रकल्पाच्या उभारणीला प्रारंभ होणार आहे. सांडपाणी प्रक्रियेसाठी गावात ३ स्तरीकरण स्थळ उभारले जाणार…

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत कराड दक्षिण मधील विविध ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामसंसद इमारत मंजूर

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत कराड दक्षिण मधील विविध ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामसंसद इमारत मंजूर झाली आहे. ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाचे बळकटीकरण ही यामागील प्रमुख उद्दिष्टये आहेत. ग्रामस्थांच्या गरजा, स्थानिक प्रश्न, विकासाचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी…

ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता.कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण

कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पैलवान खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल…

५० लाख रु. निधी मंजूर करण्यात आलेल्या मौ. तारुख येथील रस्ते कामाचे भूमिपूजन

५० लाख रु. निधी मंजूर करण्यात आलेल्या मौ. तारुख येथील रस्ते कामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. या रस्त्याच्या विकासामुळे विशेषतः पावसाळ्याच्या काळात नागरिकांना जाणवणाऱ्या चिखल, खड्डे, धूळ यांसारख्या समस्या दूर होणार आहेत. विद्यार्थ्यांपासून शेतकरी, व्यापारी, महिला व वृद्ध नागरिकांपर्यंत…

मौजे नारायणवाडी येथे ३४ लाख ५० हजार रु. रक्कम मंजूर करण्यात आलेल्या साकव पुलाचे भूमिपूजन

मौजे नारायणवाडी येथे ३४ लाख ५० हजार रु. रक्कम मंजूर करण्यात आलेल्या साकव पुलाचे भूमिपूजन ग्रामस्थ तथा मान्यवरांच्या उपस्थितीत केले. रहदारीची सोय सुलभ करण्याच्या दृष्टीने हा पूल मोठी भूमिका पार पाडणार आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात येथील नागरिकांची होणारी परवड कमी…

प्रजिमा क्र. ७८ बेलवडे ते मालखेड रस्ता सुधारणा व आरसीसी गटर बांधकाम करणे या १ कोटी ५० लक्ष मंजूर निधीच्या कामाचे भुमीपुजन

प्रजिमा क्र. ७८ बेलवडे ते मालखेड रस्ता सुधारणा व आरसीसी गटर बांधकाम करणे या १ कोटी ५० लक्ष मंजूर निधीच्या कामाचे भुमीपुजन य. मो. कृष्णा सह. कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत केले. या विकासकामामुळे…

मौ. खोडशी येथे ६ कोटी रु. मंजूर झालेल्या NH4 ते खोडशी रस्त्याचे व लहान पुलाच्या कामाचे भूमिपूजन

मौ. खोडशी येथे ६ कोटी रु. मंजूर झालेल्या NH4 ते खोडशी रस्त्याचे व लहान पुलाच्या कामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना सुलभ व सुरक्षित वाहतूक मार्ग उपलब्ध होणार असून, शेतीमाल वाहतूक, शालेय विद्यार्थी, तसेच दैनंदिन प्रवास…

जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ – २४ अंतर्गत म.रा.वि.वि.कं.(एम.एस.ई.बी.) विकास व पध्दती सुधारणा

तत्परतेने पाठपुरावा करून जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ – २४ अंतर्गत म.रा.वि.वि.कं.(एम.एस.ई.बी.) विकास व पध्दती सुधारणा कामे यामधून येळगाव येथे विद्युत पुरवठा सुधारण्यासाठी १२ लाख २३ हजार रुपये तर टाळगाव येथे ११ लाख ३९ हजार रुपये मंजूर करून आणले होते.…

कराड एसटी आगाराला नव्या पाच बसेस…

कराड एसटी आगाराला नव्या पाच बसेस उपलब्ध झाल्या असून या बसचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. याप्रसंगी कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, माजी आ. आनंदरावनाना पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागात, खेडोपाड्यात पोहोचण्यासाठी एसटी हा महत्त्वाचा धागा असून…

५ ब्रास मोफत वाळू वाटप कार्यक्रम

कराड तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना तहसिल कार्यालय व उपविभाग अधिकारी कार्यालय, कराड यांचेमार्फत ५ ब्रास मोफत वाळू वाटप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून लाभार्थ्यांना वाळूचे वाटप केले. या देशातील गरीब माणसाला बळ देण्याचे काम…