
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ – २६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कराड दक्षिण मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील कोळे, उंडाळे, काळे, शेणोली, कराड ही महसूल मंडळे आणि कराड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. या विधानसभा मतदारसंघाचा सातारा लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. कराड दक्षिण हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून, बहुतांश लोक शेतीवरच अवलंबून आहेत. त्यांचे जीवन ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, आपल्या विचारांनी समाजाला विधायक दिशा देणारे थोर विचारवंत स्व. यशवंतरावजी मोहिते (भाऊ) आणि सहकार, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपल्या देदीप्यमान कामगिरीतून कृष्णाकाठी नंदनवण फुलवणारे सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पा) यांच्या कार्यकर्तृत्वाने कराड दक्षिणचा परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. या महनीय नेत्यांच्या पाऊलवाटेवरून आ. डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले वाटचाल करीत आहेत.
वेध कराड दक्षिणच्या भविष्याचा
सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाचा
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सहकारमहर्षी स्व.जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या विचारांचा वारसा प्राणपणाने जपत आ. डॉ. अतुलबाबा भोसले अविरतपणे कार्यरत आहेत.

व्हिजन
कराड दक्षिणच्या विकासासाठी एक व्यापक व्हिजन घेऊन आ. डॉ. अतुलबाबा भोसले मार्गक्रमण करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कराडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व भव्य स्मृती संग्रहालय उभारणे, प्रीतिसंगम घाटाचे सुशोभीकरण, कराडमधील पाटण कॉलनी, स्टेडियम परिसर, आगाशिवनगर, मलकापूर तसेच इतर भागातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशस्त रस्ते, सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त असे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम यासह अनेक विकासकामांच्या पूर्ततेसाठी ते कटिबद्ध आहेत.

मिशन
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांचा विकास व सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार व समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचावणे, झोपडपट्टी वासियांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवणे, मतदारसंघाला सर्व क्षेत्रात समृद्ध आणि प्रगत बनवणे, शेतकरी, तरुण व महिलांना स्वावलंबी बनवणे हे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे मिशन आहे.