
आ. अतुलबाबांनी दिलेला शब्द हे केवळ आश्वासन नव्हतं, तर त्यांनी दिलेला विश्वास होता !
कराड दक्षिणच्या डोंगरी भागात वसलेलं आमचं गाव धोंडेवाडी. निसर्गाने चोहो बाजूने आम्हाला भरभरून दिलंय. इथली माणसं, निसर्ग आणि परंपरा हे गावाचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. पण या वैभवात एकच अडचण होती ती म्हणजे पाण्याची. पावसाळा सोडला तर पाण्याअभावी हिवाळ्यात आणि विशेष म्हणजे आता सुरु असलेल्या या कडक उन्हाळ्यात जगणंच असह्य वाटायचं. मात्र यंदाच्या उन्हाळयात अतुलबाबा नावाचा देव आमच्यासाठी धावून आला आणि आमचं असह्य जीवन सुसह्य होण्यास मोठी मदत झाली. आम्ही दिलेल्या मताचं सार्थक झालं हे आम्हाला अतुलबाबा आमदार झाल्यावर सर्वांची गाऱ्हाणी एकूण घेण्यासाठी आयोजित जनता दरबार वेळी सिद्ध झालं.
आ. अतुलबाबा आमदारकीची शपथ घेऊन विशेष अधिवेशन करून कराडला आल्याचं कळालं. त्यात जनता दरबार तारीख ठरल्याच कळताच कधी एकदा बाबाची भेट घेईन असं झालं होतं. कराड दक्षिणच्या डोंगरी भागासाठी वरदायिनी ठरलेली वाकुर्डे पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरु करा आणि आमच्या धोंडेवाडी गावचा त्यात समावेश करा यासाठी अतुलबाबा जरा मनावर घ्या, हा आमचा सर्वांचा सूर होता.
“हे आमचं काम झालचं पाहिजे, आणि बाबा तुमच्या हातून नक्की होणार, आम्हाला शब्द द्या…! असा आमचा मागण्यांचा पाढा अतुलबाबांनी ऐकला. अतुलबाबांनी लागोलाग हा विषय मार्गी लावण्यासाठी वाकुर्डे पाणी योजनेची बैठक लावली.
कराड दक्षिणमध्ये वाकुर्डे नळ पाणीपुरवठा योजनेसह अन्य कोणकोणत्या पाणीपुरवठा योजना चालू आहेत व त्यांची सद्यस्थिती काय, याबाबत संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी वाकुर्डे पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीतील कामाचा आढावा सादर करुन, विद्युत जोडणीच्या कामासाठी निधी पाहिजे असं सांगितलं.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून खास बाब म्हणून यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. ही योजना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेत धोंडेवाडी व चौगले मळासह भागातील अन्य गावांचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं पेपरात वाचलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. “धोंडेवाडीला पाणी देण्याचं स्वप्न आता साकार होतंय. आ. अतुलबाबांनी दिलेला शब्द हे केवळ आश्वासन नव्हतं, तर त्यांनी दिलेला विश्वास होता, हे मात्र मनोमन वाटतं होतं.
