
मलकापूर उड्डानपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून कामाला वेग मिळालेला आहे.
मलकापूर उड्डानपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून कामाला वेग मिळालेला आहे. कामादरम्यान कोल्हापूर नाका येथील एक सेगमेंट कोसळला, त्याचसंदर्भात आज घटनास्थळी भेट दिली आणि घटनेची सखोल माहिती घेतली.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी इथून पुढे काम करताना नागरिकांची तसेच मजुरांच्या जीवाची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला केल्या. कामाला गती देऊन लवकरच हा उड्डाणपुल जनतेसाठी कसा खुला करता येईल या अनुषंगाने काम करण्याचे निर्देश देखील यावेळी दिले.



